Home माझं गाव माझं गा-हाणं आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळेतील व वस्तीगृहातील रोजंदारी कर्मचाऱ्यांची येत्या २८...

आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळेतील व वस्तीगृहातील रोजंदारी कर्मचाऱ्यांची येत्या २८ जून पासून पदयात्रा निघून आत्मदहन इशारा

627
0

राजेंद्र पाटील राऊत


आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळेतील व वस्तीगृहातील रोजंदारी कर्मचाऱ्यांची येत्या २८ जून पासून पदयात्रा निघून आत्मदहन इशारा                                           कळवण,(नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
शासकीय आश्रम शाळा व वस्तीगृहात रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना शासनाने कायमस्वरूपी सेवेत सामावून द्यावे त्यासाठी येत्या सोमवारी दिनांक २८पासून राज्यव्यापी पदयात्रा करून आत्मदहन करण्याचा इशारा रोजंदारी संघटना कृती समिती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे डिसेंबर २०२० मध्ये आदिवासी विकास विभाग वर्ग-३ व वर्ग-४ रोजंदारी कर्मचारी यांनी नासिक ते मुंबई मंत्रालय अशी पदयात्रा काढलेली होती परंतु त्यात आमदार हिरामण खोतकर यांनी आंदोलकांना गुंडेगाव तालुका इगतपुरी थांबून शासन व आंदोलक यांच्यात मध्यस्थी केल्यानंतर आंदोलकांनी पदयात्रा केली होती मात्र या घटनेला सहा महिने उलटून गेले असल्यावर सुद्धा शासनाने याबाबत दखल घेतलेली नाही त्यामुळे रोजंदारी कर्मचारी यांच्यामध्ये नाराजी होतांना दिसून येत आहे विशेष म्हणजे कोरणा सारख्या महामारी मध्ये शासनाकडून या कर्मचाऱ्यांना विना पगार अने घरी थांबावे लागले त्यामुळे रोजंदारी वर्ग-३ व वर्ग ४ कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली तसे पाहिले तर माननीय मुख्यमंत्री साहेब व पंतप्रधान साहेब यांच्याकडून सूचना काढण्यात आलेल्या होता की कोरोना कालखंडामध्ये कुणाचाही पगार कमी करू नये किंवा कोणत्याही कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही याबाबत दखल घ्यावी असे निर्देश देण्यात आले होते पण मात्र मुख्यमंत्री साहेब व माननीय पंतप्रधान साहेब यांच्या शब्दाला आदिवासी विकास विभाग यांनी मानस दिला नाही की काय असे संचय कर्मचाऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे

Previous articleनाशिक जिल्ह्यात वटपौर्णिमा पूजन उत्साहात साजरा
Next articleकिरण शिंदे यांचा मिशन हिरवीगार डोंबिवली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here