Home नांदेड शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करा,अन्यथा बँके समोर गाढव मोर्चा काढण्यात येईल...

शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करा,अन्यथा बँके समोर गाढव मोर्चा काढण्यात येईल स्वाभिमानी संभाजी बिग्रेड चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पा.राजुरकर यांचा बँकांना इशारा

146
0

राजेंद्र पाटील राऊत

 

शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करा,अन्यथा बँके समोर गाढव मोर्चा काढण्यात येईल

स्वाभिमानी संभाजी बिग्रेड चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पा.राजुरकर यांचा बँकांना इशारा
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

मुखेड तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरसदृष्य परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने शेतीची मशागत करण्यासाठी उसने – पासने पैसे घेऊन कशीतरी मशागत केली. पण आत्ता जुन महिना आला असुन पेरणीचे दिवस आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यआवश्यक असलेले खते ,बी ,बियाणे खरेदीसाठी जवळ पैसे नसल्याने शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होत आहे.शेतकऱ्यांना खते, बी,बियाणे घेण्यासाठी खाजगी सावकाराकडे जाऊन कर्ज घ्यावे लागत आहे.तर वेळ प्रसंगी जमीन व सोन गहाण ठेवावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खते बी बियाणे खरेदी साठी होणारी हेळसांड थांबवायची असेल तर तात्काळ शेतकऱ्यांना बँके मार्फत नवीन पीक कर्ज , किंवा जुन्या पीक कर्जाचे पुनर्रगठण करून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे. कारण पेरणीचे दिवस सुरू होऊनही आजतागायेत शेतकरी पीक कर्जा पासून वंचित असताना नांदेड चे जिल्हाधिकारी , लिडबँकेचे मॅनेजर , तहसिलदार ,लोकप्रतिनिधी शांत का ?

तात्काळ मुखेड तालुक्यातील बँक अधिकारी व मॅनेजर यांना सुचना देऊन.नवीन पीक कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे. व जुन्या पीक कर्जाचे प्रकरण तात्काळ नवे जुन्ने करून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात यावे.जी बँक शेतकऱ्यांना जाणीवपुर्वक गरज नसताना त्रास देतील आशा मुजोर बँकांना जिल्हा प्रशासनाने निर्बंध घालावेत. व शेतकऱ्याची होणारी हेळसांड तात्काळ थांबवावी.अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी संभाजी बिग्रेड चे संस्थापक अध्यक्ष मा. माधवराव पाटील देवसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड तालुक्यातील जी बँक शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही.त्या बँके समोर गाढव मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी संभाजी बिग्रेड चे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील राजुरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Previous articleदेगलूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी सौ. पंचफुलाताई किशनराव खांडेकर यांची निवड..
Next articleडी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या राष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसऱ्यां वर्षी यश संपादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here