राजेंद्र पाटील राऊत
असंघटीत क्षेत्रातील कामगारांना खावटी योजना लागू करणेसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे कामगार उपायुक्तांना निवेदन.
सटाणा -(शशिकांत पवार, युवा मराठा न्यूज नेटवर्क सटाणा प्रतिनिधी) –कोरोना महामारीच्या काळात रंगकामगार, प्लंबर, वाहन दुरुस्ती, विद्युत जोडणी आदी क्षेत्रातील कुशल-अकुशल कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली असल्याने त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
असंघटीत कामगार हा समाजाचा अविभाज्य भाग असूनसुद्धा शासनाच्या धोरणऔदासिन्याचा तो बळी ठरला असल्याने त्याच्या जीविताच्या मुलभूत आर्थिक अधिकाराकडे शासन वेळोवेळी दूर्लक्ष करीत आहे.
यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, बागलाण (नाशिक) तर्फे कामगार उपायुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले.
असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या चरितार्थाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खावटी, आर्थिक सहाय्य योजना लागु करण्यात यावी अशी मागणी प्रकर्षाने मांडण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव, तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, ता महासचिव दादा खरे, मा. तालुकाध्यक्ष चेतन वनिस आदी पदाधिकारी उपस्थित होते