राजेंद्र पाटील राऊत
वडगांवात दहा मावळ्यांनी सुरू केले मोफत कोविड केअर सेंटर
वडगांव प्रतिनिधी :(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर) शहरातील दहा मावळ्यांनी एकत्र येऊन पन्नास बेडचे मोफत कोविड केअर सेंटर उभारले.
छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य मंदिर(मोफत कोविड केअर सेंटर पेठ वडगांव) याचा
शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य
श्री.अशोकराव माने , नगराध्यक्ष श्री.मोहनलाल माळी ,माजी नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ , यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती श्री.संजय सूर्यवंशी ,श्री.रमेश शिंपणेकर, श्री.चंद्रकांत सवर्डेकर, सौ.शोभा देसावळे ,श्री.शंकर यादव, श्री. सागर भोसले, श्री.डॉ.आर.ए. पाटील. या कोविड सेंटरला विशेष मदत कु. जय नितीन कुचेकर, कु.श्रीवर्धन नितीन कुचेकर, या चिमुकल्यानी खाऊसाठी दिलेले पैसे कोविड सेंटर साठी मदत म्हणून दिले.
शहरातील शेतकरी संघाच्या मंगल कार्यालय मध्ये उत्साही व आनंदी वातावरणात सुरू करण्यात आले.
त्याचबरोबर त्या ठिकाणी चहापाणी ,नाश्ता आणि जेवणाची मोफत सोय करण्यात आलेली आहे .या ठिकाणी उपचार हे मोफत केले जाणार आहेत.
यावेळी श्री.भुषण विभुते, श्री.सचिन सलगर , श्री नितीन कुचेकर,श्री पवन पोवार,श्री महेश भोपळे,
श्री विजयसिंह शिंदे, श्री विजय माने,श्री राज कोळी,श्री संजय कोठावळे (सर) ,श्री पियुश सावर्डेकर या दहा मावळ्यांचे सर्वच प्रमुख पाहुण्यांनी विषेश कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन सलगर बापु यांनी केले तर आभार भुषण विभुते यांनी मानले