राजेंद्र पाटील राऊत
तौक्ते वादळाने आंबा फळबागेचे, घरांचे मोठे नुकसान खा.डॉ.भारती पवार यांनी केली नुकसानीची पाहणी सरसकट पंचनामे करण्याच्या केल्या सूचना सटाणा,(जगदिश बधान बागलाण विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा महाराष्ट्राच्या काही भागांना बसला असून त्यात गुजरातच्या सीमेलगत असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कळवण, सुरगाणा ,पेठ, दिंडोरी तालुक्यातील गावांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे . ह्यात अनेक आदिवासी शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. ह्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता खा.डॉ.भारती पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक, खुंटविहीर, सतखांब उंबरठाण, भोरमाळ या गावांना भेट देत तेथील नुकसानीचा आढावा घेतला. या परिसरातील इतर गावांना देखील आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंब्याच्या व इतर फळांच्या संपूर्ण फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. सुरगाणा तालुक्यातील सुमारे पंधराशे हेक्टर आंबा फळबागेची लागवड असून सुमारे बाराशे हेक्टरच्या पुढे आंबा फळबागेची नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे अनेक शाळांचे ,शासकीय इमारतींचेही नुकसान झाले असून तालुक्यातील काही घरांचेही अंशतः नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अधिकाऱ्यांनी तात्काळ या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. केंद्रसरकार पण ह्या वादळात नुकसानझालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचेही खा. डॉ. भारती पवार यांनी सांगितले. ह्या प्रसंगी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस एन.डी. गावित, भाजपा उपजिल्हाध्यक्ष रमेश थोरात, भाजपा युवामोर्चाचे सचिन महाले, तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी के.एम.गायकवाड, कृषीअधिकारी झिरवाळ, कृषीसहाय्यक भोये, तलाठी चौधरी, ग्रामसेवक प्रदीप पवार, सरपंच देविदास देशमुख, पोलीसपाटील सीताराम देशमुख, लक्ष्मण गायकवाड,सखाराम गावित, योगेश चव्हाण, प्रेमराज पवार, विठ्ठल गावित, उखरम पेठे, पोपट पवार, गावकरी उपस्थित होते.तौक्ते वादळाने आंबा फळबागेचे, घरांचे मोठे नुकसान खा.डॉ.भारती पवार यांनी केली नुकसानीची पाहणी सरसकट पंचनामे करण्याच्या केल्या सूचना
नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा महाराष्ट्राच्या काही भागांना बसला असून त्यात गुजरातच्या सीमेलगत असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील कळवण, सुरगाणा ,पेठ, दिंडोरी तालुक्यातील गावांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे . ह्यात अनेक आदिवासी शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. ह्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता खा.डॉ.भारती पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक, खुंटविहीर, सतखांब उंबरठाण, भोरमाळ या गावांना भेट देत तेथील नुकसानीचा आढावा घेतला. या परिसरातील इतर गावांना देखील आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंब्याच्या व इतर फळांच्या संपूर्ण फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. सुरगाणा तालुक्यातील सुमारे पंधराशे हेक्टर आंबा फळबागेची लागवड असून सुमारे बाराशे हेक्टरच्या पुढे आंबा फळबागेची नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे अनेक शाळांचे ,शासकीय इमारतींचेही नुकसान झाले असून तालुक्यातील काही घरांचेही अंशतः नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अधिकाऱ्यांनी तात्काळ या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. केंद्रसरकार पण ह्या वादळात नुकसानझालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचेही खा. डॉ. भारती पवार यांनी सांगितले. ह्या प्रसंगी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस एन.डी. गावित, भाजपा उपजिल्हाध्यक्ष रमेश थोरात, भाजपा युवामोर्चाचे सचिन महाले, तहसीलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी के.एम.गायकवाड, कृषीअधिकारी झिरवाळ, कृषीसहाय्यक भोये, तलाठी चौधरी, ग्रामसेवक प्रदीप पवार, सरपंच देविदास देशमुख, पोलीसपाटील सीताराम देशमुख, लक्ष्मण गायकवाड,सखाराम गावित, योगेश चव्हाण, प्रेमराज पवार, विठ्ठल गावित, उखरम पेठे, पोपट पवार, गावकरी उपस्थित होते.