Home Breaking News गोदावरी मनार पब्लिक स्कुलच्या विद्यार्थीचे स्कॉऊट गाईड राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…

गोदावरी मनार पब्लिक स्कुलच्या विद्यार्थीचे स्कॉऊट गाईड राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश…

264
0

गोदावरी मनार पब्लिक स्कुलच्या विद्यार्थीचे स्कॉऊट गाईड राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर :-गोदावरी मनार पब्लिक स्कुल शंकरनगर या नामाकिंत निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थीची भारत स्काऊट गाईड यांच्या विद्यमाने दरवर्षी प्रमाने यावर्षी देखील राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात येते यावर्षी हि स्पर्धा फेब्रुवारी २०२१ या महिन्यात घेण्यात आली होती.या परीक्षेत गोदावरी मनार पब्लिक स्कुलच्या सहा (०६) विद्यार्थी पात्र झाले आहेत.निवासी शाळेमध्ये स्काऊट गटात प्रणव संतोष होलगरे,यादव कोंडिबा भिसे व विशाल बाबुराव खोकले तर गाईड गटात स्माइली रघुनाथ सिड्डाम ,वनमाला गजानन सपकाळ व रेणुका शंकररव वानखेडे यांनी यश संपादन केले आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.खा.भास्कररावजी पाटील खतगावकर ,संस्थेचे सचिव डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर,प्राचार्य डि.पी.पांडे, सौ.रेखा.पांडे,तेजप्रकाश तिवारी,स्वाती दोमाटे,गणेश येरडे,सुर्यंवशी रामचंद्र ,वाघमारे खंडू,शेरे पुष्पा, मुंसाडे नामदेव ,जाधव शामसुंदर यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here