राजेंद्र पाटील राऊत
तोकते वादळाचा फटका सुरगाणा तालुक्यातही (पांडुरंग गायकवाड युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी -सुरगाणा )
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याच रूपांतर हे चक्रीवादळात झालं, या चक्रीवादळाचा तासी वेग ६०ते ८०किमी असल्यामुळे या वादळाचा तडाखा सुरगाणा तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या वादळाने हिरावून घेतल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करीत आहे. शासनस्तरावरून या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे,
तसेच या तोकते चक्रीवादळाने घरांवरील, शाळेवरील, आरोग्य केंद्रावरील पत्रे उडवली आहेत. यामुळे येथील गरीब लोकांचे खूप मोठे नुकसान झालेलं आहे.