Home मराठवाडा उस्मानाबाद (धराशिव ) येथे होत असलेल्या देशातील पहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री...

उस्मानाबाद (धराशिव ) येथे होत असलेल्या देशातील पहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते अॉनलाईन उद्घाटन

210
0

राजेंद्र पाटील राऊत

उस्मानाबाद (धराशिव ) येथे होत असलेल्या देशातील पहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते अॉनलाईन उद्घाटन

राजेश एन भांगे

उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव येथील, धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिले आॉक्सिजन निर्मिती चार प्रकल्प उभा केला आहे.
या ऑक्सिजन प्रकल्पाचा उद्घाटन शुभारंभ राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला.

साखर कारखान्यात प्राणवायू बनवून कोरोनाच्या संकट काळात जनतेला जीवनदान देणारा देशातील पहिला पायलट प्रकल्प म्हणून धाराशिव कारखान्याची नोंद झाली आहे.
केवळ १७ दिवसात या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
यातून २० टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. प्रकल्पामुळे धाराशिव जिल्हातील कोरोना बाधित रुग्णांना लागणारा प्राणवायू पूर्ण क्षमतेने पुरवला जाणार आहे.

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे नाव देशात पोचवून ऑक्सिजनची निर्मिती करणारे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील हे देशातील पहिले आॉक्सिजन निर्मिती करणारे कारखानदार ठरले आहेत.

या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व राज्य महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय ना.नितीनजी गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील साहेब, आरोग्य मंत्री ना. राजेशजी टोपे साहेब, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील साहेब, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील,जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

Previous articleआ. चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज – ना.अशोक चव्हाण
Next articleमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेत करावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here