Home नांदेड मुखेड तालुक्यातील केरूर व तांदळी या गावांमध्ये मंगळवारी कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन...

मुखेड तालुक्यातील केरूर व तांदळी या गावांमध्ये मंगळवारी कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे ऊगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

197
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील केरूर व तांदळी या गावांमध्ये मंगळवारी कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे ऊगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
खरिप हंगाम २०२१ पुर्व नियोजनाच्या अनुशंगाने सोयाबीन बियाण्याचा बाजारातील संभाव्य तुटवडा लक्षात घेता घरगुती सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या नियोजनातील एक भाग म्हणजे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक होय. प्रात्यक्षिकासाठी ओल्या गोणपाटाचा वापर करून बियाणे रुजविण्यात आले. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के व त्यापेक्षा जास्त असेल तर बियाणे पेरणीसाठी योग्य आहे. अपवादात्मक परिस्थितीत ६० टक्केपर्यंत उगवण क्षमता असलेले बियाणे ही त्याप्रमाणात मात्रा (पेरा) वाढवून पेरता येऊ शकते. तसेच पेरणीपूर्वी रासायनिक व जैविक औषधांची बीजप्रक्रिया करणे आणि जास्तीत जास्त शेतकर्यांनी सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ (रुंद सरी वरंबा) सारख्या नवीन पेरणी पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.
सदरील कामी मुखेड तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी शितोळे, मंडळ कृषी अधिकारी विशाल बिर्हाडे, कृषी पर्यवेक्षक जे. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरदरी सज्जाचे कृषी सहाय्यक एस. डी. बनसोडे व जी. एन. पिटले उपस्थित होते. तसेच गावातील शेतकरीवर्ग इ. उपस्थित होते.

Previous articleजिल्हाधिकारी कार्यालयासमोर टॅक्सी उभी करणार जय संघर्ष वाहन चालक / मालक सामाजिक संस्थेचा इशारा
Next articleदुर्गंधी पसरवणाऱ्या कंपन्यांना हद्दपार करू-संदिप फडकले यांचा इशारा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here