Home माझं गाव माझं गा-हाणं अधिकाऱ्यांची ऐसी की तैसी,ग्रामसेवकाची मनमानी मस्ती! धांद्री येथे कोरोना महामारी संदर्भात तातडीची...

अधिकाऱ्यांची ऐसी की तैसी,ग्रामसेवकाची मनमानी मस्ती! धांद्री येथे कोरोना महामारी संदर्भात तातडीची बैठक……!! ग्रामसेवक सुर्यवंशी बेपता; अपना काम बनता भाड मे जाये जनता

210
0

राजेंद्र पाटील राऊत

अधिकाऱ्यांची ऐसी की तैसी,ग्रामसेवकाची मनमानी मस्ती! धांद्री येथे कोरोना महामारी संदर्भात तातडीची बैठक……!!
ग्रामसेवक सुर्यवंशी बेपता; अपना काम बनता भाड मे जाये जनता
(अरुण शिरोळे कसमादे विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
कसमादे- बागलाण तालुक्यातील धांद्री येथे कोरोना महामारी संसर्गजन्य आजारावर उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक आयोजीत करण्यात आलेली असतानाही,शासकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेला ग्रामसेवकच बेपता झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
धांद्री या गावी कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर सदरच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.या बैठकीस सटाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोल्हे,तालुका आरोग्य अधिकारी ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्छाव,शिवसेना नेते गजेंद्र चव्हाण,राष्ट्रवादी नेते आनिल दादा चव्हाण,सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदरची आपत्कालीन बैठक घेऊन धांद्री गावाच्या शेतमळ्यांमध्ये रँपिड टेस्ट करणे,नवीन आशा वर्कर भरती करणे,अंगणवाडी कर्मचारी ,आशा वर्कर्स शिक्षक यांना मास्क सँनिटायर्झ हँण्डग्लोज तात्काळ उपलब्ध करुन देणे तसेच अंत्यसंस्कारासाठी लागणारे किट ग्रामपंचायत देण्यास तयार असतानाही ग्रामसेवक सुर्यवंशी मात्र उडवाउडवीचे उतरे देऊन हे नियमात बसत नाही वगैरे स्वरुपाच्या वल्गना करुन ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे,अशी प्रतिक्रिया युवा मराठा न्युजला सरपंच नंदू सोनवणे व उपसरपंच शालिनी हिरामण शिरोळे यांनी बोलताना दिली.
दरम्यान ग्रामसेवक सुर्यवंशी यांचा कारभार म्हणजे “अपना काम बनता भाड मे जाये जनता” या स्वरुपाचा अनागोंदी माजविणारा असल्याने गटविकास अधिकारी कोल्हे यांचेकडे याबाबत तक्रार करण्यात आल्याचे खात्रीलायकरित्या समजते.तर सदर सुर्यवंशी नामक ग्रामसेवकाची मालेगांव तालुक्यातील कारकिर्द हि वादग्रस्त होती,त्यामुळे सदर ग्रामसेवकाची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात येऊन तेथून हलविण्यात आले होते.त्याशिवाय ग्रामसेवक सुर्यवंशीच्या हेकेखोर वर्तणूकीमुळे संपूर्ण धांद्री गावाचा विकास खोळंबलेला असून,मुजोर ग्रामसेवक सुर्यवंशीबाबत धांद्री ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी वारवार तक्रारी करुनदेखील गटविकास अधिकार कोल्हे हे नेमक्या कोणत्या हेतूने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करुन संबधित ग्रामसेवकाची पाठराखण करीत आहेत,असा सवाल आता धांद्री ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.कोरोनासारख्या महाभयानक संकटातही सदरचा सुर्यवंशी नामक वरिष्ठांच्या बैठकीकडे पाठ फिरवून अधिकाऱ्यांची आपल्यासमोर काहीच किंमत नाही हे दाखविण्याचा वारंवार प्रयत्न करुनही अधिकारी या गोष्टीकडे नेमका कानाडोळा का करतात?हाच एक चिंतनाचा प्रश्न आहे.तर जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड मँडम यांनीच आता या अशा हेकेखोर व मिजासखोर मग्रुर ग्रामसेवक सुर्यवंशीची तात्काळ धांद्री येथून उचलबांगडी करुन त्याची खातेनिहाय चौकशीची मागणी ग्रामपंचायत पदाधिका-यांनी केली आहे.

Previous articleराष्ट्रवादीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची मदत
Next articleमनपाडळे गावची यात्रा रद्द ,जनता कर्फ्यूही जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here