Home माझं गाव माझं गा-हाणं ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीत कोरोना उपचार...

ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीत कोरोना उपचार केंद्र तत्काळ सुरू करण्याची डाँ.प्रसाद सोनवणेंची मागणी                 

205

राजेंद्र पाटील राऊत

ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सुसज्ज इमारतीत कोरोना उपचार केंद्र तत्काळ सुरू करण्याची डाँ.प्रसाद सोनवणेंची मागणी                               सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व परिसर गेल्या दोन महिन्यात कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे.रोज रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र कोरोना रुग्णांना उपचारासाठी स्थानिक पातळीवर उपचार केंद्र नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.सध्या रुग्णसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यात रुग्ण दगावल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत.अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारासाठी स्थानिक पातळीवर उपचार केंद्र सुरू होणे गरजेचे बनले आहे.कोरोणा रुग्णांना चाचणी सकारात्मक आल्यास त्वरित उपचार केंद्रात दाखल केल्यास कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या वाढून कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होणार आहे.
आयुष्मान भारत योजना अंतर्गत गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी निवासस्थान यांचे काम सुरू होते. ते काम पूर्ण होऊन बराच कालावधी लोटूनही या इमारती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने कोट्यवधी रुपये खर्चाच्या इमारती ‘ शो पिस ‘ बनल्या आहेत.विशेष म्हणजे कोरोनाच्या महाभयंकर साथीत शासनाच्या या इमारती वापराविना पडल्या आहेत हे विशेष.
ताहाराबाद व परिसरात कोरोनाचा वाढता फैलाव बघता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत कोरोना उपचार केंद्र तत्काळ सुरू करून याठिकाणी ऑक्सीजन बेड सह सर्व सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात अपूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांची त्वरित नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून रुग्णांना उपचारासाठी अडचण निर्माण होणार नाही.

Previous articleतांदळी येथे भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी
Next articleराष्ट्रवादीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची मदत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.