राजेंद्र पाटील राऊत
🛑 चोरवणे जखमींचीवाडी ते गारवणे रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
खेड:-⭕रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे जखमींची वाडी रस्त्याचे काम कित्येक वर्षे रखडले होते २६ जानेवारी या दिवशी श्री संतोष अनंत मेस्त्री आणि ग्रामस्थ यांनी आमरण उपोषणा चा इशारा देताच बांधकाम खात्याकडून १५ लाख आणि सन्मानीय श्री अरविंद चव्हाण साहेब यांच्याकडून 15 लाख निधी चे पत्रक देऊन उपोषण मागे घेतले गेले होते पण त्या कामाचे अद्याप काही समजले नाही परंतु.या रस्त्याचे काम २०१९-२०२० ला मंजूर झाले होते ते काम या वर्षी मार्च महिन्यात सुरू करण्यात आले आहे चोरवणे जखमीची वाडी रस्त्याचे सुरू करण्यात आलेले डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे असे चोरवणे जखमीचे वाडीतील ग्रामस्थ म्हणणे आहे तशी तक्रार करत आहेत.ही तक्रार चिपळूण बांधकाम विभागाचे श्री.कदम रावसाहेब यांना वेळोवेळी देऊन कदम रावसाहेब त्याकडे गेली १ महिने दुर्लक्ष करत आहेत.
वरील रस्त्या बाबत सतत प्रयत्न शील असणारे जल फाउंडेशन चे सल्लागार श्री वसंत मोरे यांनी सतत सूचना देऊनही वरिष्ठांकडून दुर्लक्ष केले जात आहे चोरवणे जखमींचे वाडीचे ग्रामस्थ आणि श्री सुनील मेस्त्री , यांनी रावसाहेब यांना वेळोवेळी फोन करून सुद्धा आजपर्यंत रावसाहेब रास्ता पाहण्यासाठी आले नाहीत.
त्यामुळे चोरवणे जखमींची वाडीतील ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.येत्या दोन ते तीन दिवसांत कदम रावसाहेब आणि बांधकाम खात्यातील संबंधित अधिकारी चोरवणे जखमीची वाडी मध्ये हजर न झाल्यास १ मे ला पुन्हा उपोषणाला बसू असे श्री संतोष मेस्त्री, श्री सुनील मेस्त्री आणि ग्रामस्थ यांनी सांगितले आहे.⭕