Home पुणे दौंड तालुक्यातील नानगावच्या महिलांनी ॲमेझॉनवर गोवऱ्या विकल्या, तेलंगाणामधून वाढती मागणी 🛑

दौंड तालुक्यातील नानगावच्या महिलांनी ॲमेझॉनवर गोवऱ्या विकल्या, तेलंगाणामधून वाढती मागणी 🛑

122
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 दौंड तालुक्यातील नानगावच्या महिलांनी ॲमेझॉनवर गोवऱ्या विकल्या, तेलंगाणामधून वाढती मागणी 🛑
✍️ दौड 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

दौंड:⭕ तालुक्यातील नानगाव येथील महिलांनी चक्क अ‌ॅमेझॉनवर गाई-म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या विकण्यास सुरवात केली.
पुणे: गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या किंवा शेणाच्या गोळ्यांचा उपयोग पूर्वी घरोघरी केला जायचा. गोवऱ्यांच्या मोठ- मोठ्या गंजी ग्रामीण भागात घरोघरी पहायला मिळायच्या. परंतु, आता या गोवऱ्या लोप पावत चालल्यात. मात्र, पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील नानगाव येथील बचत गटाच्या महिलांनी गोवऱ्या तयार करुन त्या ॲमेझॉनवर ऑनलाईन विक्री करण्यास सुरवात केलीय. महिलांच्या प्रयत्नांना यश आलं असून गोवऱ्यांना परराज्यातून म्हणजेच तेलंगाणातून मागणी आलीय.

अ‌ॅमेझॉनवर गाई-म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या विकण्यास सुरुवात
तंत्रज्ञानाचा आधार घेत जगाच्या पाठीवर कोण काय विकेल,हे सांगता येत नाही. दौंड तालुक्यातील नानगाव येथील महिलांनी चक्क अ‌ॅमेझॉनवर गाई-म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या विकण्यास सुरवात केली आणि तेलंगाणामधून गोवऱ्या मागणी देखील आली आहे. या मागणीचे पार्सल पोस्टाने आता तेलंगणामध्ये पाठविण्यात आले आहे.

तेलंगाणा, पुणे आणि मुंबईतूनही मागणी

दौंड तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आश्लेषा शेलार यांच्या पुढाकाराने पाच वर्षापूर्वी श्री महिला बचत गटाची स्थापना केली,मागील काळात बचत गट जेमतेम सुरू होता. शेलार यांनी गोवऱ्या थापण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्यांनी थेटॲमेझॉनवर या व्यवसायाची नोंद केल्यानंतर १५ रुपयांना एक गोवरी अशा भावाने विकली जात आहे. आता दौंड तालुक्यातील नानगाव मधील गोवऱ्यांना पुणे,मुंबई,दिल्ली याचबरोबर तेलंगणातूनही मागणी वाढायला लागलीय, अशी माहिती बचतगटातील महिलांनी दिली.
अ‌ॅमेझॉनवर गाई-म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या विकण्यास सुरुवात.

बचतगटातर्फे विविध कामं
नानगाव येथे महिला बचत गटाची स्थापना केल्या नंतर अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला. मसाला बनविणे,शेवया बनविणे,लोणचे बनविणे, असे अनेक व्यवसाय महिलांनी सुरू केले होते. परंतु, पहिल्यांदाच शेणापासून गोवऱ्या बनविण्याचे काम गावातील महिला बचत गटातर्फे सुरू केले. ऑनलाईन विक्रीसाठी या गोवऱ्या परराज्यात पाठविण्यात आल्या आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे..

या उपक्रमाची प्रेरणा घेऊन आम्ही देखील असे उपक्रम राबविणार असल्याचे स्थानिक महिलांनी बोलून दाखवलंय..
अ‌ॅमेझॉनवर गोवऱ्या विकणारं पहिलं गावं
नानगाव येथील बचत गटांनी तयार केलेल्या गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गवऱ्या तेलंगणा राज्यात निर्यात झाल्या आहेत.अ‌ॅमेझॉनवर बचत गटांनी तयार केलेल्या मालाची विक्री करणारे नानगाव हे तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे.

शेणाच्या गोवऱ्या अमेझॉनवर चांगली विक्री झाल्याने आता महिला बचत गटातील सर्व महिला या व्यवसायातून उत्पन्न मिळवण्याची संधी आहे.⭕

Previous articleडोंबिवली रुग्णालयात लिफ्ट कोसळल्याने चार जखमी 🛑
Next articleचोरवणे जखमींचीवाडी ते गारवणे रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here