राजेंद्र पाटील राऊत
🛑 धैर्य सामाजिक संस्थे मार्फ़त शब्दवेळ वाचनालय उपक्रमाचे उद्घाटन 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
रायगड:-⭕रायगड जिल्हा परिषद शाळा रानवडी बु. येथे दिनांक २०/०४/२१ रोजी धैर्य सामाजिक संस्था संचलित शब्दवेल वाचनालय, पुस्तकांची शाळा रानवडी या वाचनालय उपक्रमाचे उद्घाटन समारंभ पार पडला.
या उपक्रमासाठी श्री सुभाष साळुंके वरीष्ठ विस्तार अधिकारी, अशोक कासार केंद्रप्रमुख, अनिल पाटील केंद्रप्रमुख, सोपान चांदे मुख्याध्यापक, सखाराम वारे शा. व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, सुरेश उतेकर मुंबई मंडळ अध्यक्ष, धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर , व्यवस्थापक अमोल उतेकर, सदस्य विनायक उतेकर, माजी पोलीस उपनिरीक्षक महादेव उतेकर, उपशिक्षिका श्रीमती वंदना सकटे, उपशिक्षक श्री पोपट काळे, उपशिक्षिका श्रीम. अरुणा कराडे, माजी मिठागर विभाग अधिकारी महादेव उतेकर उपस्थित होते. रानवडी बु. शाळेतील शिक्षकांनी आवर्जून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. तसेच शाळेचा स्वतंत्र वर्ग या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिला.शाळेच्या वेळेत शिक्षकांनी वाचनालयाच्या व्यवस्थापनाचे कार्य पाहण्याची जबाबदारी घेतली आहे.
धैर्य सामाजिक संस्थेच्या पुस्तकांची शाळा रानवडी या प्रकल्पाचे व्यवस्थापक कु . अमोल उतेकर यांनी पुस्तकांचे योग्य नियोजन करत पुस्तके शाळेत क्रमवार मांडण्याचे कार्य केले. या कार्यासाठी घागरकोंड शाळेतील विद्यार्थी कु. सुजल दळवी यांनी देखील मदत केली.⭕