Home कोल्हापूर तु मला आवडतेस,तुझ्याशीच करीन लग्न! योगेशने विवाहितेला फसवून केले स्वप्नभंग!!किणी येथे अस्ट्रोसिटी...

तु मला आवडतेस,तुझ्याशीच करीन लग्न! योगेशने विवाहितेला फसवून केले स्वप्नभंग!!किणी येथे अस्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

154
0

राजेंद्र पाटील राऊत

“तु मला आवडतेस,तुझ्याशीच करीन लग्न! योगेशने विवाहितेला फसवून केले स्वप्नभंग!!किणी येथे अस्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
कोल्हापूर ,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पेठ वडगांव : किणी ता. हातकणंगले येथील योगेश नेमिनाथ चौगले याच्यावर महिलेची फसवणूक व अत्याचार केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी आरोपी योगेश चौगुले याने फिर्यादी महिलेला राहते घरी किणी येथे आय. एम.सी.कंपनीच्या सौंदर्य प्रसाधने विक्री करण्यास मदत करतो या बहाण्याने फिर्यादीला तुम्ही घरी बसल्या कंपनीच्या सौंदर्य प्रसाधने विक्री करून पैस कमवू शकता असे म्हणून तु मला शाळृत असलेपासुन आवडतेस तु तुझ्या नवऱ्याला सोडून दे आणि माझ्याशी लग्नकर आणि मी तुला सुखात ठेवीन असे म्हणून तिच्या कडून मोबाईल नंबर मिळवला नंतर तिच्याशी वारंवार फोनवरून संपर्क साधला व लग्न करायचे या आश्वासनावर अनेक वेळा तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले व या गोष्टींचे माझ्या मोबाईलमधील फोटो तुझ्या सासरच्यांना व गावात पाठवीन अशी धमकी दिली याचा त्रास सहन न झाल्यामुळे फिर्यादीने आरोपी योगेशच्या घरच्यांना व मित्रांना याची माहिती दिल्यावर आरोपीने फिर्यादीच्या सासरच्या व माहेरच्या घराची खिडक्यांची नासधूस केली व शिवीगाळ केली म्हणून फिर्यादीने वडगांव पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल केली आहे.
आरोपीस भा.द.वि.स.कलम ३७६,३३६,४२७,५०६,५०७ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सदर गुन्ह्यास attracity कलम वाढवणेत आले असुन अधिक तपास वैजने साहेब डी.वाय.एस.पी. जयसिंगपूर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here