Home माझं गाव माझं गा-हाणं पालघर जिल्हात जंबो कोविड सेंटर उभारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन.

पालघर जिल्हात जंबो कोविड सेंटर उभारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन.

224

राजेंद्र पाटील राऊत

पालघर जिल्हात जंबो कोविड सेंटर उभारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन.                      पालघर,(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

पालघर जिल्ह्यातील सामान्य जनतेची आर्थिक परिस्तिथी खालावलेली आहे. गेल्या वर्ष भराच्या लॉक डाउन चा फटका मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक व हातावर पोट असणाऱ्यांना बसला आहे.आजच्या स्थितीला रोजच्या जेवणाचं प्रश्न याच्या पुढे असतांनाच कोरोना आपले विक्राळ रूप धारण करीत आहे.जिल्हातील रुग्णालयातील खाटाची संख्या कमी व रुग्ण प्रमाण भारी अशी बिकट परिस्थिती आपल्या जिल्ह्याची झाली आहे. त्यात भर म्हणून सरकारी आरोग्य केंद्र कमी क्षमतेचे असल्याने सर्व सामान्य रुग्ण पैशा अभावी खाजगी रुग्णालयात जाऊच शकत नसल्याने त्याला घरीच थांबून मृत्यूची वाट पाहण्याची कठीण वेळ गरिबांवर आली आहे.पोट भरायला पैसे नाही तर इलाजासाठी हजारो रुपये आणायचे कुठून गरीब सर्वसाधारण खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करू शकत नाही परिणामी उपचाराअभावी मृत्यू ला सामोरे जावे लागते आहे.जिल्हाधिकारी यांनी जंबो कोविड सेंटर उभारा व खासदार -* *आमदारांनी त्यास स्थानिक विकास निधीतून पैसे देऊन जंबो कोविड सेंटर उभारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष जनाठे यांनी पालघर मधील लोकप्रतिनधींना तसेच जिल्हाधिकारी याना निवेदन.
1) पालघर जिल्ह्यात जंबो कोविड सेंटर उभे करा.
2)जंबो कोविड सेंटर उभे करण्यासाठी खासदार गावित साहेबांनी स्थानिक विकास निधीतून 1 कोटी व जिल्ह्यातील सर्व सहा आमदारांनी प्रत्येकी 50 लाख रुपये द्यावेत.
3)एडवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारा

अशी जिल्हयातील सामान्य माणसांसाठी मागणी संतोष जनाठे यांनी जिल्हाधिकारी पालघर,खासदार गावित व जिल्ह्यातील सर्व आमदारांकडे मागणी केली आहे.

Previous articleआपल्या आठ बहिणभावांसह झोपडपट्टीत राहायचे गौतम अदानी…! आज आहेत अब्जाधीश
Next articleतु मला आवडतेस,तुझ्याशीच करीन लग्न! योगेशने विवाहितेला फसवून केले स्वप्नभंग!!किणी येथे अस्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.