राजेंद्र पाटील राऊत
धक्कादायक” देगलूर – बिलोली मतदारसंघाचे (काँग्रेसचे) आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन
राजेश एन भांगे/युवा मराठा न्युज नेटवर्क
देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय ६३ वर्ष) यांचे आज दि. ९ एप्रिल रोजी रात्री ११:३० च्या सुमारास मुंबई येथील हाॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान दुर्दैवी निधन झाले.
त्यांना २५ दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आमदार अंतापूरकर हे २५ दिवसांपूर्वी कोरोना बधित झाले होते.
तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते.
नांदेड येथील भगवती रुग्णालयात ३ दिवस उपचार घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले.
मागील ८ दिवसापासून ते अत्यवस्थ होते.
अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे
एक हळव्या मनाचा आमदार आपल्या पासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आमदार अंतापूरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,एक मुलगा,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.