• Home
  • मा.पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

मा.पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210330-WA0046.jpg

 

मा.पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

(विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबईचे माजी. पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर
नवी मुंबईतील नेरुळमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे आज पहाटेच्या दरम्यान निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते, मागील काही दिवसांपासून धनंजय जाधव यांना ह्दयासंबंधित आजाराचा त्रास होता.
धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगावात झाला. प्राथमिक शिक्षण मूळगावीच, तर माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एमएससी ही पदव्युत्तर पदवी घेतली. सुरवातीला ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले होते.
धनंजय जाधव यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन १९७३ मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलं.
काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर २००७ मध्ये त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
धनंजय जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी साताऱ्यातील पुसेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.

anews Banner

Leave A Comment