• Home
  • बिलोली तालुक्यातील मिनकी गावालगत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक ◆दोन तरुण जागीच ठार

बिलोली तालुक्यातील मिनकी गावालगत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक ◆दोन तरुण जागीच ठार

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210329-WA0030.jpg

बिलोली तालुक्यातील मिनकी गावालगत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक
◆दोन तरुण जागीच ठार

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बिलोली तालुक्यातील मिनकी गावालगत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.हि घटना दि.28 मार्च रोजी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे.
बिलोली ते देगलुर राज्य महामार्गावर मिनकी येथील माळरानावर महादेव मंदिराजवळ दोन मोटारसायकली ची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सगरोळी येथील संतोष लक्ष्मण गायकवाड वय 26 वर्षे हा मोटारसायकल क्रमांक TS 07 FE5291 व भगवान गंगाधर नरवाडे वय 27 वर्ष मोटारसायकल क्रमांक TS01EC5807 बिलोली कडून आदमपूर कडे जात असताना दोघांच्या मोटरसायकलीची मिनकी येथील माळरानावर महादेव मंदिरालगत समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भयंकर होता की त्यात संतोष गायकवाड व भगवान नरवाडे या दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले, जनार्दन भोसले, भारत फतांडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयताच्या कुटुंबीयांनी परस्पर विरोधी तक्रारी बिलोली पोलीस स्थानकात दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनील सनगले साहेब हे करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment