Home नांदेड कोरोना covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुकाराम महाराज बीज उत्सवास देहू येथे न...

कोरोना covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुकाराम महाराज बीज उत्सवास देहू येथे न येण्याचे ह.भ.प. संजय महाराज हिवराळे यांचे आवाहन…

138
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुकाराम महाराज बीज उत्सवास देहू येथे न येण्याचे ह.भ.प. संजय महाराज हिवराळे यांचे आवाहन…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुकाराम महाराज बीज उत्सवास न येण्याचे आव्हान
राष्ट्रीय सचिव वारकरी सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ह. भ. प. संजय महाराज हिवराळे यांनी आव्हान केले.
कोरोनाच्या covid-19 वाढत्या प्रादुर्भावामुळे व
सर्वाचे आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनाचा आदर करून. समस्त आळंदीकर.वारकरी सेवा फाऊंडेशन. भक्ती शक्ती संघ. .गुरूकुल संघ.यांची मिटींग घेऊन जगद्गगुरू तुकाराम महाराज बीज ऊत्सवास न जाण्याचा व वारकरी बांधवाला न येण्याचा निर्णय घेतला आहे. कारण गेली 12 महिन्यत सरकारला कोरोना आटोक्यात आणता आला नाही आजही दररोज पेशन्टं वाढतायतच देशात 10 जिल्ह्य़ात कोरोना जास्त आहे पैकी 9 जिल्हे महाराष्ट्रतले आहेत. आपल्या चलो देहुच्या आव्हानमुळे सरकार त्याचे खापर महाराष्ट्रतल्या वारकरी संप्रदायावरच फुटेल. देहुला वारकरी न गेल्याने कोरोना कीती आटोक्यात येणार आहे ते पण पहाता येईल. म्हणून आपण परत एकवेळ प्रशासनाचा सन्मान करीत आपण देहुला येऊ नये अशी विनंती करतो. पण सरकार ने प्रत्येक गावात 100 लोका मध्ये बीज ऊत्सवास परवानगी द्यावी अशी आम्ही विनंती केली आहे ती स्वीकारून वारकरी संप्रदायातील भावनेचा आदर करावा हि विनंती.
राष्ट्रीय सचिव वारकरी सेवा फाऊंडेशन म.रा.
ह.भ.प.संजय महाराज हिवराळे आळंदी दे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here