Home कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 49 हजार 115 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात आजअखेर 49 हजार 115 जणांना डिस्चार्ज

147
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्ह्यात आजअखेर 49 हजार 115 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर :(युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज
आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1389 प्राप्त अहवालापैकी 1327 अहवाल निगेटिव्ह तर 32 अहवाल पॉझिटिव्ह (26 अहवाल नाकारण्यात आले व 4 परत पॉझीटिव्ह). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 117 प्राप्त अहवालापैकी 107 अहवाल निगेटिव्ह तर 10 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 260 प्राप्त अहवालापैकी 229 निगेटिव्ह तर 31 अहवाल पॉझिटिव्ह असे एकूण 73 अहवाल पॉझीटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 51 हजार 476 पॉझीटिव्हपैकी 49 हजार 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 602 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 73 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, भुदरगड-1, हातकणंगले-4, करवीर-10, पन्हाळा-1, शाहूवाडी-2, शिरोळ-3, नगरपालिका क्षेत्र- 15, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 30 व इतर जिल्हा व राज्यातील -5 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-908, भुदरगड- 1253, चंदगड- 1235, गडहिंग्लज- 1544, गगनबावडा- 155, हातकणंगले-5377, कागल-1695, करवीर-5833, पन्हाळा- 1888, राधानगरी-1267, शाहूवाडी-1369, शिरोळ- 2526, नगरपरिषद क्षेत्र-7657, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 16 हजार 187 असे एकूण 48 हजार 826 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 582 असे मिळून एकूण 51 हजार 476 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकुण 51 हजार 476 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 49 हजार 115 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 759 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 602 इतकी आहे.

.

Previous articleभारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश 🛑
Next articleपालक मंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या आमदार निधीतून भोकर विधानसभा मतदार संघासाठी दोन नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.,.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here