• Home
  • भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश 🛑

भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210325-WA0001.jpg

✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई -⭕ २४ मार्च रोजी जोगेश्वरी ( पुर्व) येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रुग्णालयात भारतीय कामगार सेना अध्यक्ष / खासदार / शिवसेना नेते अरविंद सावंत आणि भारतीय कामगार सेना चिटणीस / संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहचिटणीस / संजीव राऊत, सुजित कारेकर, दशरथ (बाबू) केरकर, संतोष सावंत व शिवसेना शाखा क्र.७२ चे शाखाप्रमुख अमरनाथ मालवणकर, विलेपार्ले ८३ – ८५ चे उपविभाग अधिकारी समीर राणे आणि युनिट लिडर राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सदर रुग्णालयातील बहूद्देशीय कामगार (एम.पी.एल) यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले.सोमवार दिनांक – २२ मार्च रोजी यासंदर्भात इशारा देण्याकरिता काम बंद करण्यात आले होते तेव्हा मंगळवार दिनांक – २३ मार्च रोजी पगार देणार असल्याचे सिगमा या कंपनीकडून सांगण्यात आले परंतु मंगळवारी पगार न दिल्याने बुधवार दिनांक – २४ मार्च रोजी सकाळी ठीक ०८:३० वाजल्यापासुन ते दुपारी २ वाजेपर्यंत या कामगारांनी काम बंद केले होते.

त्यानंतर सिगमा या कंपनीचे मॅनेजर यांनी येऊन युनियन आणि रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी / डॉ. राजेंद्र बच्छाव यांच्या समोर सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे आणि सिगमा या कंपनीचे मालक काही समस्येमध्ये मध्ये फसल्यामुळे पगार उशिरा होईल व त्यांनी म्हणजे सिगमा कंपनीच्या मेनेजर यांनी याबाबत व कामगारांच्या कोविड भत्ते, पगार आणि पीएफ संदर्भात लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे.

यावेळी भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत कामगारांच्या पाठीशी सदैव उभे राहु व त्यांच्या या मागण्या पुर्ण केल्याशिवाय राहणार नाही.⭕

anews Banner

Leave A Comment