Home पुणे वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो ड्रोन मधून पहा कसा दिसतोय मार्ग…! लवकरच होणार...

वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो ड्रोन मधून पहा कसा दिसतोय मार्ग…! लवकरच होणार ट्रायल रन

154
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो ड्रोन मधून पहा कसा दिसतोय मार्ग…! लवकरच होणार ट्रायल रन 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे /वनाझ :⭕ महामेट्रो प्रक्लपांतर्गत पुण्यात सुरु असलेल्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या 5 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची चाचणी (ट्रायल रन) येत्या महिनाभरात घेण्यात येणार आहे.

त्यासाठी मेट्रोच्या तीन डब्यांच्या दोन कोच वनाज डेपोत दाखल झाल्याची माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.

महामेट्रोने वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गांचे काम पुर्णत्वास आणले असून विद्यूत खांब, संगणकीय दिशादर्शक दिवे आदी कामे अंतीम टप्प्यात आहेत. त्यामुळे डब्यांची मागणी केली होती. त्यानुसार 2 गाड्यांचे प्रत्येकी 3 असे सहा डबे वनाज डेपोत दाखल झाले आहेत.

नागपूर मेट्रोसाठीचे हे डबे असून ते फक्त चाचणीसाठी वापरले जाणार आहेत. पुण्यातील दोन्ही मार्गांवरील मेट्रोचे डबे इटलीतील कारखान्यातून येणार असून ते विशेष प्रकारच्या हलक्या पण कडक अशा धातूपासून बनवले आहेत. चाचणीपूर्व तयारीला महिनाभर लागणार आहे. ऊन्नत मार्गावरील काही किरकोळ पण मेट्रो धावण्यासाठी महत्वाची असलेली कामे सुरु असून ती त्वरीत करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला केल्या आहेत.

मार्गावरील सर्व स्थानकांपैकी गरवारे महाविद्यालय, आयडीयल कॉलनी, आनंदनगर या स्थानकांचे काम आता 60 टक्के झाले आहे. छत व अन्य कामेही तातडीने, जास्तीचे मजूर लावून करण्यात येत असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली…⭕

Previous articleटेमघर गळती रोखण्यासाठी २५ कोटी; दीर्घ कामाचे नियोजन 🛑
Next articleघरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती द्या ; अन्यथा रस्त्यावर उतरू ▶️लाभार्थ्यांचे तहसिलदारांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here