Home मुंबई १३ मार्च २०२० रोजी ठाण्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला

१३ मार्च २०२० रोजी ठाण्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला

115
0

राजेंद्र पाटील राऊत

१३ मार्च २०२० रोजी ठाण्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला

मुंबई : गेल्या वर्षी १३ मार्च २०२० रोजी ठाण्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता.
आरोग्य यंत्रणासह जिल्हा, पोलिस प्रशासन यांची उपाययोजनांसाठी धावपळ सुरू झाली. मुंबईप्रमाणेच धावत्या ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला ब्रेक लागला. त्यानंतर दररोज वाढणारे रुग्ण अपुऱ्या आरोग्य सुविधा, रुग्णालयातील अपुरी खाटांची संख्या, रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची होणारी फरपट, मृत्यू या सर्व गोष्टींना वर्ष पूर्ण होत आहेत. सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्‍यात येत असल्याचे चित्र होते. मात्र फेब्रुवारी अखेरपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने वर्षपूर्तीनंतरही कोरोनाची धग, भीती अजूनही कायम आहे.  (युवा मराठा न्युज नेटवर्क)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here