राजेंद्र पाटील राऊत
राज्य सरकार पुन्हा एकदा लाँकडाऊन होण्याची शक्यता,
अजित पवार
औरंगाबाद : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आल्यानं राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कारण तसे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत गंभीर आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल”, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
औरंगाबादमध्ये अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
युवा मराठा न्युज नेटवर्क .




