Home नांदेड उंद्री(प.दे) येथे प्रधानमंत्री आवास योनतेअंतर्गत घरकुलांचा भुमिपूजन सोहळा ,योजनेच्या अमंलबजावणीस सुरूवात…

उंद्री(प.दे) येथे प्रधानमंत्री आवास योनतेअंतर्गत घरकुलांचा भुमिपूजन सोहळा ,योजनेच्या अमंलबजावणीस सुरूवात…

102
0

राजेंद्र पाटील राऊत

उंद्री(प.दे) येथे प्रधानमंत्री आवास योनतेअंतर्गत घरकुलांचा भुमिपूजन सोहळा ,योजनेच्या अमंलबजावणीस सुरूवात…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड : प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.
महा आवास अभियानांतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करून घरकुलाचे भुमिपूजन करावे अश्या शासकीय आदेशानुसार आज उंद्री (प.दे) येथे भुमिपूजन व सत्कार सोहळा पार पडला यावेळी पं.स.सदस्य नागनाथ कोटीवाले, गृहनिर्माण अभियंता-पी.बी.जोगावार,शाखा अभियंता एस.आर.करखेलवार ,ख.वि.संघ संचालक-माधवराव पा.उंद्रीकर,सरपंच प्रतिनिधी हणमंत गन्लेवार,शंकर महाराज गन्लेवार, ग्रामसेवक एस.एम.डुमणे, मा.सरपंच प्रतिनिधी शिवाजीराव पंदनवाड,गोपाळ पा.बिरादार,अच्युतराव पाटील,नागेश जनवाडे,ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी रमेश अडबलवार ,गोविंद राठोड ,मुकिंदा सोनकांबळे,आदी उपस्थित होते.
यावेळी घरकूल पात्र लाभार्थी पद्माकर माहेगावे,तुकाराम कोनापुरे,सुर्यभान पवार,मारोती दोमाटे आदींच्या घरकुलाचा भुमिपूजन सोहळा पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here