Home माझं गाव माझं गा-हाणं शिक्षक ध्येय: शिक्षकांसाठी मुक्त व्यासपीठ

शिक्षक ध्येय: शिक्षकांसाठी मुक्त व्यासपीठ

181

राजेंद्र पाटील राऊत

शिक्षक ध्येय: शिक्षकांसाठी मुक्त व्यासपीठ
(युवा मराठा न्युज नेटवर्क)

सिन्नर: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडण्यासाठी प्रत्येक शिक्षक तळमळीने काम करत असतो. खेड्या- पाड्यात वाडी-वस्तीत दूर्गम भागात नवनवीन उपक्रम राबवत असतात परंतु त्यांच्या कामाची योग्य दखल व प्रसिद्ध न मिळाल्याने ते दूर्लक्षीत राहतात. अशा शिक्षकांना व त्यांच्या कामाला शिक्षक ध्येय साप्ताहिक व मासिक राज्यभर प्रसिद्धी देणारे मुक्त व्यासपीठ ठरले असल्याची प्रतिक्रिया पंचायत समिती सिन्नर जि.नाशिक येथील गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके यांनी दिली. सिन्नर तालूका प्रतिनिधी विनायक काकुळते यांनी आज त्यांना कार्यालयात जाऊन शिक्षक ध्येय कॅलेंडर, फेब्रुवारीचे मासिक, दिवाळी अंक भेट दिला.
संपादक मधुकर घायदार यांच्या संपूर्ण संपादकीय टीमच्या कामाचे कौतुक करत जिल्हा परिषद शिक्षकांचे देखील लेखन साहीत्य यापुढे पाठवेन त्यांना प्रसिद्धी द्यावी अशी विनंती त्यांनी श्री. काकुळते यांना केली. शिक्षक ध्येयचे कॅलेंडर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.

Previous articleनिमगांवला सरपंचपदी सरला जगताप तर उपसरपंच आकाश हिरे
Next articleतळवाडे सरपंचपदी अहिल्याबाई जाधव तर उपसरपंचपदी प्रमोद (पप्पू) कदम बिनविरोध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.