Home पश्चिम महाराष्ट्र सातारा बसस्थानकात सहा शिवशाही बसला अचानक आग

सातारा बसस्थानकात सहा शिवशाही बसला अचानक आग

181

राजेंद्र पाटील राऊत

सातारा बसस्थानकात सहा शिवशाही बसला अचानक आग

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील बस स्थानकात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला आज अचानक आग लागली. या घटनेने सातारा शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या दुर्घटनेनंतर सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
अग्नीशामक दलाची गाडी घटना स्थळी दाखल झाली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

युवा मराठा न्युज नेटवर्क .