• Home
  • मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनास सुरुवात.

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनास सुरुवात.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210210-WA0030.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलनास सुरुवात.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे श्री राम जन्मभूमि निधी संकलनास सुरुवात करण्यात आली.अयोध्या मध्ये सुरू असलेल्या भव्य अश्या श्री राम मंदिर निर्माण कार्यात आपलाही खारीचा वाटा राहावा यासाठी मुखेड तालुक्यातून निधी संकलन कार्य सुरू असून दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मुखेड तालुक्यातील जाहुर येथील श्रीराम भक्तांनी अयोध्या येथे भव्य मंदिर निर्माण देणगी म्हणून निधी देऊन आपला हातभार लावला निधी संकलनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मुखेड येथील किशोर सिंह चव्हाण, महेश मुक्कावार, गिरीश देशपांडे, शंकर उत्तरवार, समर्थ देशमुख, ईरन्ना पाटील भागानगरे, निलेश कामाजी गादगे आदींनी निधी संकलनासाठी परिश्रम घेतले यावेळी गावातील भारत सावकार दामेकर, नामदेव पाटील हिवराळे जाहुरकर, दादाराव पाटील बोडके, काशिनाथ पाटील बोडके, अशोक पाटील हिवराळे, ब्रहमा महाराज जाहूरकर, देवीदास पाटील बोडके, देविदास जंगमवाड व गावातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment