• Home
  • मुखेड विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी श्री गुरुनाथ पाटील पाळेकर यांची निवड..

मुखेड विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी श्री गुरुनाथ पाटील पाळेकर यांची निवड..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210209-WA0050.jpg

मुखेड विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी श्री गुरुनाथ पाटील पाळेकर यांची निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड विधानसभा काँग्रेस सोशल मीडियाच्या तालुका प्रमुख पदी श्री गुरुनाथ पाटील पाळेकर यांची निवड करण्यात आली असून दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते सोशल मीडिया च्या मुखेड विधानसभा प्रमुखपदी गुरुनाथ पाटील पाळेकर यांची निवड करण्यात आली असून नामदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सोशल मीडिया हे माहिती व संपर्काचे नव्या युगातील अतिशय सशक्त प्रसार माध्यम आहे. या माध्यमातून काँग्रेसची ध्येयधोरणे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत व काँग्रेसची सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष विचारधारा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. सोशल मीडियाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसोबत आदरणीय साहेबांनी बराच वेळ मुक्त संवाद साधला. सोशल मीडिया कशी हाताळली पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी माजी मंत्री डी. पी .सावंत साहेब, आमदार अमर भाऊ राजूरकर साहेब, आमदार मोहन अण्णा हंबर्डे साहेब, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर साहेब, सत्यप्रभा कार्यकारी संपादक संतोष भाऊ पांडागळे साहेब हे उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून व गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

anews Banner

Leave A Comment