Home कोल्हापूर नर्सिंग विभागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार

नर्सिंग विभागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार

160

राजेंद्र पाटील राऊत

नर्सिंग विभागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार

कोल्हापूर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय महाविद्याल कोल्हापूर येथील नर्सिंग विभागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीवर छ. प्रमिलाराजे रूग्णालयातील पुरुष परिचारिकाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना रविवारी सकाळी १० च्या सुमारात ओटी विभागात घडली. या घटनेने सी.पी.आर.मध्ये खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची माहिती पीडित विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांनी दिली. ते सकाळी सोलापूरहून तातडीने कोल्हापुरात दाखल झाले.
त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती सी.पी.आर.चे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे आणि परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिली. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी संशयिताला चोप दिला. दरम्यान, घटनेनंतर त्या पीडित विद्यार्थ्यांनीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिला सी.पी.आर.मधे दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर तिथे उपचार सुरु आहे. या प्रकरणी सी.पी.आर.पोलिस चौकीत गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

युवा मराठा न्युज नेटवर्क .