राजेंद्र पाटील राऊत
युनायटेड मराठा organization मार्फत सामाजिक उपक्रम (युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.)
सोलापूर.
एक निस्सिम शिवभक्त स्वप्निल कोलते पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आपला एक शिवभक्त गेला .स्वप्निल सर लिखित मुकद्दर हे पुस्तक आम्हांला देखील वाचायचे होते. पण आज ते पुस्तक आपल्या सर्वांना पर्यंत एक वेगळा उद्देश घेऊन पोहचले आहे . स्वप्नील सर गेल्यामुळे सर्व समाजामधुन त्यांच्या परिवारासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही आर्थिक मदत मुकद्दर हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यातुन छपाईचा खर्च वगळता शिल्लक राहनरी सर्व रक्कम त्यांच्या परिवारासाठी देण्यात यावी.
आपण देखील समाजाचा एक भाग आहोत आणि समाजाचे आपण काही देणे लागतो असे आम्हांला वाटते. आम्ही युनाइटेड मराठा ऑर्गनायझेशन टीम या आर्थिक मदतीसाठी सहभागी झालो आणि UMO चे टीम मेंबर ज्योती ताई गायकवाड आणि चैतन्य पताळे यांनी coordinate करून जवळपास अकरा हजार रुपयांची पुस्तक खरेदी केली आणि आमच्या मित्रपरिवाराला देखील पुस्तक घेण्याचे अहवान केले आणि त्या आवाहनाला बराच प्रतिसाद भेटला आणि बऱ्याच लोकांनी खरेदी केले .आम्ही पुनश्च एकादा सर्व समाजाला अहवान करतो की मुकद्दर पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी घेऊया आणि स्वप्निल कोलते सरांना आगळी वेगळी श्रध्दाजंली अर्पण करूया .🙏
#team_umo
#UMO
#united_maratha_organization



