Home Breaking News मराठा नगरमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

मराठा नगरमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

145
0

 

पेठ वडगांव : प्रतिनिधी  हातकणंगले तालुक्यातील वडगांव शहरातील अँड.अक्षय भोसले युवा मंच व रामकृष्ण तरूण मंडळ यांच्यावतीने पेठ वडगांव, मराठा नगर व पानमळा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिराची सुरवात दिपप्रज्वलन करून ,  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी.नगरसेवक श्री. राजकुमार पोळ (बापू) व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होली मदर इंग्लिश स्कुलचे चेअरमन श्री. सुजयसिंह राऊत (सर) यांनी तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन श्री.शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाह  श्री.अभिजीत गायकवाड (दादा)
यांच्या हस्ते करण्यात आले.
हे शिबिर मराठा नगर मधील होली मदर इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. या परिसरातील तरुणांपासुन ते वयोवृद्धापर्यंत सुमारे १५० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे .यामध्ये नेत्रतपासनी करीता ४० नागरीकांची नोंद झाली , तसेच मोफत रक्त , लघवी तपासनी व उपचाराकरीता ३७ महीला व पुरूष यांनी लाभ घेतला, तसेच सर्जरी करीता २३ नागरिकांनी नावे नोंद केली.
या शिबिरा मध्ये  नागरीकांची नेत्र व इतर  मोफत शस्त्रक्रिया देखील  करण्यात येणार आहे.
तसेच इतर तपासणीसाठी सुमारे ५० नागरीकांनी नोंद केली .
यावेळी कोरोची (इचलकरंजी) ता.हातकणंगले येथील भैरवनाथ शिक्षण समूहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमा खामकर  ,अनुराधा कांबळे व  सहकारी उर्मिला किल्लेदार, रेणुका पुजारी , सलोनी कांबळे , शिशाका चव्हाण, प्रियांका डांगे, प्रतीक्षा सोनवणे व पेठ वडगांव मधील नेत्ररोग तज्ञ डॉ. सुशांत सकटे यांचे विशेष सहकार्य लाभले. कोरोना काळापासून वडगांव शहरात हे पहिल्या आरोग्य शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केल्या बद्दल व सामाजिक कार्यात कोरोना कालावधीत तसेच दिपावली सनासुदीच्या वेळेत पानमळा , मराठा नगर, पन्हाळकर वसाहत , विष्णू मंदिर परिसरात इत्यादी ठिकाणच्या  नागरीकांना मोलाचे सहकार्य व उल्लेखनीय सामाजिक कार्य  केल्याबद्दल  युवा मराठा चे कार्यकारी संपादक श्री.मोहन शिंदे यांनी अँड.अक्षय भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच या शिबिराचे आयोजन  अँड.अक्षय भोसले युवा मंच व  श्री रामकृष्ण तरूण मंडळाच्या  कार्यकर्त्यांनी  यशस्वीपणे पार पाडले . या शिबिर प्रसंगी माजी.नगराध्यक्ष श्री.अभिजित पोळ, मा.नगरसेवक राजू देवस्थळी, मा.नगरसेवक श्री. प्रकाश भोसले, माजी. सैनिक श्री .विलास नरूटे (सर), श्री.सचिन पाटील, श्री.कृष्णात पाटील सर, रामभाऊ पाटील तात्या, मा.उपनगराध्यक्ष आनंदा म्हेतर, श्री.पी. बी. पाटील सर,श्री. श्री .विजय पाटील सर , श्री.नदकिशोर पाटील सर,
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

संकलन – मोहन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे.)व ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) ता. मुखेड मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन
Next articleविवाहित प्रियसीला रात्रीच्यावेळी भेटायला गेलेल्या पोलीसाचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here