Home कोल्हापूर मुलीचे आगमन हत्तीवरून

मुलीचे आगमन हत्तीवरून

119
0

राजेंद्र पाटील राऊत

मुलीचे आगमन हत्तीवरून

चावरे : तालुका हातकणंगले येथील तिर्था हिचे स्वागत हत्ती वरुन मिरवणूक काढून करण्यात आले.
तिर्था व डॉ. दिपिका महाडिक यांचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले.
मुलगा वंशाचा दिवा असल्याने स्त्री भ्रूणहत्या होत आहेत. आधुनिक युगातच मुलींचा टक्का घसरत असल्याचे चित्र असतानाच देशसेवेतून कँप्टन म्हणून निवृत्त झालेल्या गणपतराव महाडिक यांनी नातीचे चावरे येथील आपल्या घरी स्वागत हत्तीवरून मिरवणूक काढत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवल्याने त्यांचे परीसरात प्रचंड कौतुक होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या चावरे येथील देशसेवेतून निवृत्त झालेले कँप्टन व विश्ववारणा पब्लीक स्कूलचे संस्थापक गणपतराव भगवान घोडके ,संपतराव भगवान घोडके(महाडिक)यांची नात व दिपक व सौ.डॉ. दिपीका महाडिक यांची कन्या तिर्था हिचे पहिल्यांदा चावरे आगमन होणार होते.
समाजात मुलगाच वंशाचा दिवा असल्याने स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढले आहे. मुलगी झाल्यानंतर त्या घरात प्रचंड निराशा पसरते. आणि तिला मामाच्या गावातून आपल्या घरी चुपचाप आणले जाते. कँप्टन
गणपतराव भगवान घोडके, पत्नी अलका,मुलगा दिपक, स्नुषा डॉ. दिपीका महाडिक यांनी “कन्या वाचवा अभियान,स्त्री भ्रूणहत्या” मुलींच्या बाबतचा समाजा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि जनजागृती होण्यासाठी ‘तिर्था’ ची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे वनविभाग,पोलीस या यंत्रणांची परवानगी काढून हत्ती आणण्यात आला. गावच्या वेशीवरून माता डॉ. दिपीका तिर्था यांची तुतारी सह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. हत्तीवरून पेढे,साखर वाटप करण्यात आली. मुली सुध्दा मुलांच्या बरोबरीने कर्तव्य बजावतात.
या निमित्त मुलींचे शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यानंतर रात्री स्नेहभोजनानंथर स्वरसंगीत कार्यक्रमातील मराठी, हिंदी भक्तीमय गितांनी नागरीकांची मनोरंजनासह देशप्रेमाने मेजवानी झाली. या आगळ्या वेगळ्या स्वागताने मुलींच्या विषयी प्रेम पहायला मिळाले. यामुळे परीसरात महाडिक कुटुबिंयाचे कौतुक झाले.
हा उपक्रम पाहण्यासाठी चावरे परीसरतील नागरीकांनी गर्दी केली.
महाडिक कुटुबिंयासह विश्ववारणा पब्लिक स्कूलचे सचिव डी.पी. पाटील, प्रा.संभाजी पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींमध्ये सत्तां राखण्यात यश
Next articleस्त्री स्वातंत्र्य .किती खरे,किती खोटे?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here