Home कोल्हापूर पेठ वडगांव मधे गावठी दारूची विक्री , पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

पेठ वडगांव मधे गावठी दारूची विक्री , पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

187

राजेंद्र पाटील राऊत

पेठ वडगांव मधे गावठी दारूची विक्री ,
पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

पेठ वडगांव : शहरात हातभट्टीची गावठी दारूची विक्री राजरोस पणे विक्री होत असुन पोलस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
वडगांव पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष घालणे गरजेच असुन गावठी दारू विक्रीला परवानगी नसताना देखील वडगांव शहरात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री १० रू.ग्लास ते ८० रू. बाटली अश्या दरात दारू विकली जाते.
जिल्ह्यात गावठी दारूला तयार करण्यास बंदी असुन देखील ति तयार होते कुठे ? आणि गावठी दारूची विक्री होतेच कशी काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
गावठी दारूमुळे आनेकांनी जीव गमावला असुन , अनेकांचे संसार उद्वस्त झाले आहेत तरी देखील वडगांव शहरात दारूची विक्री होत आहे .
सद्या वडगांव शहरातील पोलिस ठाण्यात प्रशिक्षणार्थ आय.पी.एस.अधिकारी असताना देखील गावठी दारू विक्री करणारे न घाबरता राजरोस पणे व कुणाच्या संगणमताने विक्री करत आहेत हे समजने गरजेच बनले आहे.                           युवा मराठा न्युज नेटवर्क