राजेंद्र पाटील राऊत
पुरोगामी पत्रकार संघाच्या युवक संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रशांत कोठावदे (जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सटाणा:- महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघाच्या युवक संघर्ष समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी सटाणा येथील साई सावली फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांची निवड केल्याची घोषणा पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी नुकतीच पनवेल येथे पार पडलेल्या राज्यस्थरीय बैठकीत घोषणा केली.
प्रामुख्याने युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या समितीचे काम असुन त्यांचे काम पुर्ण राज्यात राहणार आहे तसेच युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सदरची समिती काम करेल असे विजय सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
पुरोगामी पत्रकार संघाची राज्यस्थरीय वार्षिक बैठक नुकतीच पनवेल येथे आयोजित करण्यात आली होती त्या वेळी प्रशांत कोठावदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सदर च्या बैठकीत सिने अभिनेत्री सुनिता तौमुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे कार्यध्यक्ष डॉन एन.के.के., सचिव प्रवीण परमार, राज्य उपाध्यक्ष प्रकाश चितळकर, प्रविण जोशी, नासिक जिल्हा उपाध्यक्ष रफिक सैयद, बागलाण तालुकाध्यक्ष संतोष जाधव, रुपेश सोनवणे, शरद गोरे आदिसह महाराष्ट्रातील पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
सन २०१८ मध्ये प्रशांत कोठावदे यांच्या सामाजिक कामांची दखल घेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्याच्या निवडीचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.




