Home माझं गाव माझं गा-हाणं कौळाणे-व-हाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी दोषी ग्रामसेवकांवर नेमकी कारवाई कधी? अधिकारी कोणती कारवाई...

कौळाणे-व-हाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी दोषी ग्रामसेवकांवर नेमकी कारवाई कधी? अधिकारी कोणती कारवाई करणार? जनतेत उत्सुकता…!

129
0

राजेंद्र पाटील राऊत

कौळाणे-व-हाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी दोषी ग्रामसेवकांवर नेमकी कारवाई कधी? अधिकारी कोणती कारवाई करणार? जनतेत उत्सुकता…!
मालेगांव,( ब्युरो टिम युवा मराठा)- गेल्या अनेक महिन्यापासून बहुचर्चित असलेल्या कौळाणे (निं.) आणि व-हाणे येथील पत्रकार भवनच्या जागाप्रश्नी प्रथमदर्शनी हलगर्जीपणा करुन चालढकल करणाऱ्या व-हाणे व कौळाणे येथील ग्रामसेवकांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका पंचायत समितीच्या चौकशी अधिकारी गुलाब राजबन्शी यांनी ठेवला असल्याचे चौकशी अहवालाव्दारे सिध्द झाल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
पत्रकार भवन आणि निवासस्थानाच्या जागाप्रश्नी व-हाणे गांवी ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे यांनी शासनाचा अध्यादेश व मालेगांवचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांचे तात्काळ कार्यवाहीबाबतचे पत्र असतानाही हेतूत चालढकल करुन पत्रकार भवनास जागा देण्यास अडचणी निर्माण होतील,असे काम करुन दुसऱ्या बाजुला गावात असलेल्या वाचनालयास जागा देताना कुठलाही ठराव किंवा शासनाची परवानगी नसताना परस्पर वाचनालयास ग्रामपंचायत रेकाँर्डला नोंद करुन वाचनालयास जागेचा उतारा बहाल केल्याने पदाचा दुरुपयोग केल्याचे सिध्द होत असल्याचे या चौकशीत अहवालात म्हटले असून,त्यामुळे ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे या नियमानुसार कारवाईस पात्र ठरत असल्याचे चौकशी अधिकारी गुलाब राजबन्शी यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
तर कौळाणे (नि.) येथील जागा प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे यांनी सन२०१८ साली पत्रकार भवनच्या कामासाठी जागा दिल्याबाबत ग्रामपंचायत रेकाँर्डला नोंद करुन उतारा दिला,त्याशिवाय बांधकाम परवानगी देण्याबरोबरच एक वर्षाची कर आकारणी देखील वसूल केली.त्यानंतरच्या काळात ग्रामसेवक संजीव घोंगडे यांचा कार्यभार कौळाणे (नि.) गावी नसतानाही पदाचा दुरुपयोग करुन तत्कालीन सरपंच सौ,लताबाई बच्छाव यांच्या संगनमताने सदरची पत्रकार भवनला दिलेली जागा सन आँगस्ट २०२० मध्ये प्रशासकीय कारकिर्द सुरु असताना नामंजूर केली,हा कायद्याचा भंग असल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवक संजीव घोंगडे नियमानुसार कारवाईस पात्र ठरतात असा अभिप्राय चौकशी अधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालात नोंदविला आहे,
संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकाचा विषय ठरलेल्या या पत्रकार भवनच्या जागाप्रश्नी दोषी असलेल्या दोघांही गावातील ग्रामसेवकांवर प्रशासन आता नेमकी पुढील कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here