राजेंद्र पाटील राऊत
शेतकरी_अंदोलन”भारत बंदला देगलूर मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद
नांदेड, दि.८ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क
दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड व इतर समविचारी पक्ष व संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन आजचा भारत बंद आंदोलन यशस्वी केले.
या आंदोलनाच्या वेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतपुरकर,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई,मपा गटनेतेअविनाश निलामवर, तालुकाध्यक्ष प्रीतम देसाई, शिवसेनेचे महेश पाटील, प्रहारचे कैलास येसगे,सामाजिक कार्यकर्ते विकास नर्बाग, सुमित व्यंकटराव कांबळे,नाना मोरे,जनार्दन बिरादार,बालाजी थडके , माजी नपा उपाध्यक्ष बालाजी टेकाळे, नागोराव वाडीकर,पिंटू जोशी, गोरसेनेचे विशाल पवार, यांच्यासह महा विकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी आपली उपस्थिती दाखून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला व आज पुकारलेला देशव्यापी बंद मध्ये व्यापाऱ्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला.