राजेंद्र पाटील राऊत
मुखेड येथे सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत यासाठी सर्वपक्षीय मुखेड बंदचे आवाहन….मुखेड बंद! मुखेड बंद! मुखेड बंद!
–मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
*लढा भविष्यासाठी, लढा शेतकऱ्यांसाठी
भाजप सरकारने लादलेले कृषीविरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘भारत बंद’ला पाठिंबा देण्यासाठी मुखेड येथे सर्वपक्षीय
मुखेड बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपल्या न्याय हक्काच्या,
या लढाईत मुखेड तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी, व शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती सर्व पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.भाऊसाहेब पा. मंडलापुरकर तालुका काँग्रेस कमिटी मुखेड व बालाजी पाटील.कबणूरकर तालुका अध्यक्ष शिवसेना मुखेड व शिवाजी राव पा.जाधव तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुखेड व शंकर दादा वडेवार तालुका अध्यक्ष प्रहार संघटना मुखेड व युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पा. कलंबर कर यांनी आवाहन केले आहे.