राजेंद्र पाटील राऊत
भीम आर्मी भारतीय एकता मिशनच्या वतीने मुखेड तहसील कार्यालयावर भव्य असुडाची आरोळी मोर्चा ….
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील सर्व शेत करी कष्टकरी सुरक्षित बेरोजगार अपंग निराधार केंद्र तसेच राज्य सरकारच्या बेसुमार जबाबदार अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य माणसाचा जीना हराम झाले आहे त्यांची या सरकारला कसलीच जळ कळ नाही म्हणून अशा झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्यासाठी जीवन उपयोगी मागण्या घेऊन भव्य असुडाची आरोळी मोर्चाचे आयोजन भीम आर्मी तालुका शाखा मुखेड च्या वतीने ठेवण्यात आले होते भीम आर्मी तालुका शाखा मुखेडच्या प्रमुख मागण्या संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीचे पंचनामे करून सरसगड तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकर्यास तात्काळ हेक्टरी 50 हजार अनुदान जाहीर करण्यात यावे तालुक्यातील करोना काळातील शेतीपंप घरगुती व्यवसायिक वाढीव वीज बिल तात्काळ माफ करण्यात यावी व शेतकऱ्यांना वीज मोफत पुरवठा करण्यात यावा तालुक्यातील रोजगारांना एमआरजीएस योजनेमार्फत तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे ऑनलाईन शिक्षण पद्धत बंद करण्यात यावी व त्वरित शाळा व कॉलेज सुरू करण्यात यावे कायद्याच्या आधीन राहून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थाने उघडण्यात यावे सबंध महाराष्ट्रात व देशात होत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना लक्षात घेऊन मुखेड तालुक्यातील व मुखेड शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास cctvकॅमेरे नगरपालिका व ग्रामपंचायत कार्यालयाच्या विकास निधीतून बसविण्यात यावे सन 2005 पासून मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीतील 14 व्या वित्त आयोगात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित दोषी वर गुन्हे दाखल करण्यात यावे भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष अँड भाई चंद्रशेखर आजाद यांनाz+ सुरक्षा देण्यात यावी तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी तात्काळ वाटप करण्यात यावा हे पीक कर्ज सरसकट माफ करून तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पीएम हॉलमध्ये बंद पडलेला फ्रिज चालू करण्यात यावा व गर्भवती महिलांना बाहेरून मेडिशन आणण्यास सांगत आहेत ते सर्व मेडिशन उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावे अशी भीम आर्मी त्यांच्या मागण्या होत्या या मोर्चाचे नेतृत्व मा आशिष भारदे भीम आर्मी जिल्हाध्यक्ष नांदेड प्रमुख मार्गदर्शक राहुल भाऊ प्रधान अशोक भाऊ वायवळे अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते