राजेंद्र पाटील राऊत
*जागतिक मृदा दिनानिमित्त मुखेडात शेतकरी प्रशिक्षण शिबीर संपन्न*
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधुन मुखेड तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने मुखेड तहसील कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी प्रशिक्षण शिबीर पार पडले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषि अधिकारी शिवाजीराव शितोळे तर प्रमुख पाहुने म्हणून सेवानिवृत्त तालुका कृषि अधिकारी विजय घुगे, मंडल कृषि अधिकारी विशाल बिराडे, भारत नागरे अदि उपस्थित होते.
यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, प्रधानमंत्री सुरक्षा खाध अन्नयव योजना, कर्षी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत वित्त पुरवठा सुविधा व नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विजय घुगे म्हणाले की देशात आणि विशेषता: महाराष्ट्रात गेल्या कांही वर्षात हवामानामध्ये आकस्मिक बदल होत असून असून त्याचा शेतीवर वाइट परिणाम होत आहेत मौसमी पावसाचे उशिरा आगमन होने, लवकर निघुन जाने, पावसाळ्यात पावसाचे दिवस कमी होने, कमी दिवसात जास्त पाऊस पडने, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडने, पावसाळ्यात तीन अठवढयापेक्षा अधिक खंड पडने किंवा यावेळी पाऊस पडने यामुळे शेती उत्पादनावर याचा मोठा दुष्परिणाम होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणी आला आहे. यातच रासायनिक खताचा अति वापर यामुळे शेती नापिक होत चालली आहे. रासायनिक खताच्या अति वापरामुळे शेतजमिनीतिल जीवाणु नष्ट होत चालल्याने पिकावर रोगाचा पादुर्भाव वाढत चालला असून याचा पिक उत्पादनावर प्रचंड परिणाम होत आहे. महागडी बी- बियाने, रासायनिक खते व कीटक नाशक फवारणीचा अधिकाचा खर्च, मजूरिचा खर्च अधिक आणि उत्पन्न कमी व शेतीमालाला योग्य दर नसल्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत येत आहेत. यावर मात करण्यासाठी व शेतीतील खर्च कमी करण्यासाठी व शेती मालाचे उत्पादन वाढवन्यासाठी शेतकऱ्यानी शेद्रीय खताचा वापर करने काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांनी बाजारातील महागडे बियाने न घेता शेतात पिकलेल्या बियानाचा वापर करावा व कीटक नाशक औषधी कडू लिबांच्या लीबोळी पासून कीटक नाशक तयार केल्यास खर्च कमी होवून उत्पन्न वाढवन्यास नकीच फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाणाला बाविस्टिन रायजोबियम औषधिचा वापर केल्यास पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढन्यास मदत मिळेल व पिकाचे 20 टक्क्याने उत्पादन वाढन्यास मदत मिळेल असे ते म्हणाले.
ते पुढे बोलताना शेतकऱ्यांना शेतीलगत जोड धंदा करण्याचा सल्ला दिला.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना विशाल बिराडे म्हणाले की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाधवन्याचा व शेतकऱ्यांना संघटीत करण्याचे केंद्र व राज्यशासनाचे धोरण असून शेतकऱ्यांना शेती निघडीत जोड व्यवसायासाठी वरील विविध योजना आमलात आणली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गटाचे संघ करून शासनाच्या योजनेचा लाभ घेवून शेतकरी आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन केले. प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविक भारत नागरे यांनी केले तर सूत्रसंचालन राजकुमार कांबळे यांनी केले तर
आभार अविष्कार भालेराव यांनी मांडले
प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी कृषि पर्यवेक्षक मुंजाजी अडकिने, जोतिबा पवार, कृषि सहायक सुनील बनसोडे, राजेश पाठनकर, संतोष दबडे समुद्रपती तिकटे,गणेश पिटले,प्रशांत सुर्यवंशी, संजय आचमारे व सर्व कृषि विभागाचे कर्मचारी आदिने प्रयत्न केले.
चर्चासत्रात शेतकरी बांधवानी ईफको पिक विमा कंपनीच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त करीत पिक नुकसानीचे तक्रारी करूनही पिकविम्याची रक्कम देत नसल्याचे सांगितले यावर्षी अतिवृष्टीने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले असून उत्पादन 70 टक्क्याने घटले आहे. अती पाऊस झाल्याने तुरीचे पिक वाळून गेले असून तुर नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.