Home Breaking News वडगांव प्रिमियर लिग 2020 ऐतिहासिक पर्व

वडगांव प्रिमियर लिग 2020 ऐतिहासिक पर्व

158
0

 

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वडगांव शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांव शहरात आई अबांबाईच्या आशिर्वादाने  वडगांव प्रिमीयर लिग 2020 हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबा वाडी येथे आज पासुन सुरूवात होत आहे.
IPL खेळ संपल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात  प्रथमच पेठ वडगांव शहरात ऐतिहासिक पर्व VPL 2020 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळूडाना थर्मल टेस्ट , व सँनीटायझर ची सोय उपलब्ध केली आहे. तसेच प्रेक्षकांसाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आज सकाळी ७- ३० वाजता वडगांव शहरातुन सर्व खेळाडू , संघमालक यांची भव्य रँली निघणार आहे . त्यानंतर ९-०० स्पर्धेच उदघाटण मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून होणार आहे . ठिक ९-३० वाजता स्पर्धेला सुरवात होणार आहे.
या स्पर्धेत वडगांव शहरातील आठ संघानी सहभाग घेतला आहे ,
भोसले अँम्पिअर्स , कुडाळकर 11 , डिके लाँयन्स , संतोष माने चँलेजंर्स , प्रविण दुर्गुळे सनराईझ , राम राँयल्स , सचिन चव्हाण सुपर किंग , अंकुश माने वाँरीअर्स असे आठ बलाढ्य संघ स्पर्धेत सहभाग घेतला असुन ही स्पर्धा आठ दिवस रंगणार आहे तसेच या स्पर्धेचा लाईव्ह स्कोर प्रत्येकाच्या मोबाईलमधे पहायला मिळणार आहे. ही स्पर्धा दररोज दि. ०६-१२-२०२० ते ११-१२-२०२० पर्यंत चार संघामधे सामणा होणार आहेत , दि. १२-१२-२०२० रोजी. सेमि फायनलला तिन संघामधे सामणा असणार आहे.
दि.१३-१२-२०२० रोजी. फायनल चा शेवटचा सामणा वडगांव प्रिमीअर लिग 2020 ऐतिहासिक दिन असणार आहे .

या स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या संघास २५,००० रूपये आणि चषक मा.श्री.राजवर्धन पाटील , मा.श्री. अमर जयसिंग पाटील यांचेकडून असणार आहे,
द्वितीय क्रमांक येणाऱ्या संघास १५,००० रूपये आणि चषक मा.श्री. अजय थोरात नगरसेवक , मा.श्री.अमोल हुकेरी उद्योजक यांचेकडून ,
तृतीय क्रमांक येणाऱ्या संघास १०,००० रूपये आणि चषक मा.श्री. सागर गुरव , मा.श्री. अमित घोटणे (सर) यांचेकडून असणार आहे. तसेच इतर आणखी वेगवेगळी बक्षिसेही खेळाडूना मिळणार आहेत.
प्रत्येक सामण्यासाठी विजेत्या संघास मँन आँफ द मँच व चषक , ७०० रूपये व पराभूत लढवय्या संघास चषक , ३०० रूपये बक्षीस(चषक वरद डिजीटल)
विजयसिंह यादव प्रतिष्ठान यांचेकडून एकूण ३२,००० रूपयांची बक्षिसे असणार आहेत.

संकलन – मोहन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here