राजेंद्र पाटील राऊत
पुणे ५ डिसेंबर ⭕ (युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕
पुणे_ सरपंचांनी कामाचा लेखाजोखा तपासावा नितीन गडकरी
एम आय टि तर्फे आयोजित राष्ट्रीय सरपंच संसदेचा समारोप.
नीतिमत्ता अर्थ व्यवस्था पर्यावरण आणि वातावरण या गोष्टीवर सरपंचांनी भर दिल्यास गाव समृद्ध होईल.
शिक्षण आरोग्य पाणी क्रीडा संस्कार अध्यात्म आणि बाजारपेठ सारख्या बहुअंगाने विचार करावा.
शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा उपयोग करून घेऊन गावचा विकास करावा.
आप आपल्या कामाचा सरपंचांनी लेखाजोखा तपासत राहावा.
असा सल्ला केंद्रीय रस्ते दळणवळण आणि महामार्ग विकास मंत्री नितींजी गडकरी यांनी सरपंचांना दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट तर्फे आयोजित ऑनलाईन दुसऱ्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी केंद्रीय पंचायतराज विभागाचे मंत्री नरेंद्रसिंह तोमर केंद्रीय राज्यमंत्री प्रताप चंद्र सारंगी संस्थेचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री हुकुमदेव यादव जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा खासदार पी पी चौधरी उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक राहुल कराड प्रमुख समन्वयक योगेश पाटील कुलगुरू डॉक्टर एन टी राव संचालक रवींद्रनाथ पाटील डॉक्टर शैलेश श्री हरिदास उपस्थित होते.
निर्मल ग्राम व स्वच्छ भारत या योजना राबविण्याचे कार्य सरपंचांनी योग्य प्रकारे करावे राहुल कराड म्हणाले.
सरपंचाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संसद भरवली जाते.