राजेंद्र पाटील राऊत
🛑 खोट्या अट्रोसिटी च्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा स्वामी चिंचोली ग्रामस्थांच्या मदतीला 🛑
✍️ पुणे : ( विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :⭕दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या भेटीला मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र आणि स्वामी चिंचोली गावतील सर्व समाजातील ग्रामस्थ भेटीला.
स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे येथील माजी सरपंच श्री.सीताराम ननावरे यांना मुकुंद वेताळ आणि त्यांच्या दोन मुलानी जबर मारहाण करत प्राणघातक हल्ला केला तसेच त्यांच्यावर खोटी अट्रोसिटी दाखल केली.
सदर घटनेत मराठा समाजाला न्याय मिळावा आणि अट्रोसिटी चा गैरवापर होऊ नये या साठी ही भेट घेण्यात आली.
माननीय पोलीस अधीक्षक श्री. अभिनव देशमुख यांनी मराठा क्रांती मोर्चा आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून योग्य ती चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
मराठा क्रांती मोर्चा च्या व्यासपीठावरुन मराठा समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात एकत्र येऊ शकतो हे दाखवून दिले.
तसेच मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्री.राजन घाग, श्री.केदार कदम,श्री.विलास सुद्रीक,श्री.रुपेश मांजरेकर, श्री.विवेक सावंत,श्री.नामदेव पवार,श्री.विजय पोळ तसेच स्वामी चिंचोली गावातील माजी सरपंच एकनाथ पानसरे, कांतीलाल ननावरे, लक्ष्मण शिंदे. गजानन गुणवरे, बबनराव कुटे, सुधीर वाघमारे, सलिम मुजावर, नवनाथ वेताळ, गजानन ननावरे, तानाजी शिंदे,नवनाथ मदने, विठ्ठल भागडे, दादासाहेब धुमाळ, व पोलिस पाटील कुलदिपक ननावरे या गावातील विविध समाजाचे प्रतिनिधी नी एकत्र येऊन गावातील सलोख्यासाठी शांततेसाठी जो एकजुटपणा दाखवला त्या बद्दल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्री राजन घाग यांनी व सर्व समन्वयकांनी यांचे आभार मानले.
*मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र*