राजेंद्र पाटील राऊत
*पालघर येथे संविधान दिन उत्साहात साजरा पालघर,(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी पालघर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, टेंभोडे येथे रिपाई (आ) व आंबेडकर नगर पालघर (पुर्व) विकास समिती यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला चौकाला मानवंदना व संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले रिपाई(आ)च्या वतीने मास्क वाटप करण्यात आले त्या समयी पालघर जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश जाधव, तालुका युवा अध्यक्ष शरद जाधव, शहर उपाध्यक्ष राम ठाकूर,सूरज भोईर,शहर उपाध्यक्ष राजू शेख, शाहरुख शेख आंबेडकर नगर पालघर(पुर्व) विकास समिती चे अध्यक्ष सुनील जाधव,उपाध्यक्ष राजेश राऊत,उपखजिनदार महेश गायकवाड,सल्लागार राजेंद्र राऊत,उद्योगपती कीर्तीभाई व पालघर पोलिस स्टेशन चे अधिकारी उपस्थित होते.*