राजेंद्र पाटील राऊत
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले 1 डिसेंबरला होणारमतदार याद्यांची प्रसिद्धी..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुंबई राज्यभरातील 14233 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका साठी 1 डिसेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस .मदान यांनी दिली आहे. यावेळी बोलताना मदान यांनी सांगितले की एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या व तसेच नवनिर्मित 15 66 तसेच जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित 12667 अशा एकूण 14233 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदार याद्या तयार केल्या जातील. यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 15 66 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु covid-19 च्या परिस्थितीमुळे 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तर 19 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली. या 15 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्यावत केलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या वरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेच्या या मतदार याद्या 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होत्या परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार याद्या 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केले आहेत. मतदार यादीत नाव नोंदवलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढवता यावी. हे लोकशाहीची मुलभूत तत्व आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 15 66 ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमांसह 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये तयार केलेल्या मतदारयाद्या देखील रद्द केल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया रद्द झालेल्या ग्रामपंचायती सह एकूण 14233 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.