आमदा प्रताप सरनाईक यांच्या घरी इडीचा छापा
मुंबई : शिवेसनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांवर सकाळी छापा टाकण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे.
कारवाईचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. सद्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर गेले आहेत.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .