Home Breaking News बंगला पहायचं शहीद संग्राम पाटील यांचे स्वप्न अपूर्णच

बंगला पहायचं शहीद संग्राम पाटील यांचे स्वप्न अपूर्णच

177

बंगला पहायचं शहीद संग्राम पाटील यांचे स्वप्न अपूर्णच

कोल्हापूर : जिल्ह्यात आणखी एका जवानाला सीमेवर देशाचं रक्षण करत असताना वीरमरण आलं. संग्राम शिवाजी पाटील असं शहिद झालेल्या जवानाचं नाव आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा या मूळगावी संग्राम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या वेळी सीमेवर आमच्या अजून किती जवानांचं रक्त सांडायचं असा सवाल करण्यात आला. संग्राम हे 16 मराठा अशोकचक्र बटालियनचे जवान होते. येत्या मे महिन्यात ते निवृत्त होणार होते. निवृत्तीनंतर गावात आपला एक छोटासा बंगला असावा असं स्वप्न संग्राम यांनी पाहिलं होतं. मात्र, संग्राम यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलंय. संग्राम यांच्या मागे आई-वडिल, भाऊ-बहिण, पत्नी आणि दोन चिमुकली मुलं आहेत.
यात मोठा मुलगा 8 वर्षांचा आहे तर मुलगी 3 वर्षांची आहे.
खूप गरीबीतून आई-वडिलांनी संग्राम यांना मोठं केलं. मात्र, चांगले दिवस येत असतानाच त्यांच्यावर काळानं घाला घातला. याआधी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आलं. त्यानंतर लगेच संग्राम हे देखील देशासाठी शहीद झाले. त्यामुळं पाकिस्तानचा एकदाच निकाल लावून टाकावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. यावेळी शहिद संग्राम पाटील अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
गेल्या बुधवारीचं संग्राम यांचा भाऊ संदीप यांना फोन आला होता. घराच्या बांधकामाचं कसं काय चाललं आहे? कोण-कोणती कामं अजून बाकी आहेत? शेतातील कामाचं काय झालं? अशी सगळी चौकशी संदीप यांच्याकडे केली होती. इतकंच नाही तर मी सुट्टीला आल्यानंतर राहिलेलं कामं करु. इतर पै पाहुण्यांकडे जाता येईल असं बोलणं संदीप यांच्यासोबत झालं होतं. मात्र, घराचं स्वप्न पूर्ण न होताच दादा गेला असं सांगून संदीप यांनी हंबरडा फोडला.

Previous articleमालेगाव शहरातील नव्याने बसवलेल्या सिग्नल मुळे वाहतुक सुरळीत
Next articleआमदा प्रताप सरनाईक यांच्या घरी इडीचा छापा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.