Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २ डिसेंबर पासून सुरु होणार...

नांदेड जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २ डिसेंबर पासून सुरु होणार – जिल्हा प्रशासनाचा निर्णय जाहीर

137
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २ डिसेंबर पासून सुरु होणार – जिल्हा प्रशासनाचा निर्णय जाहीर

नांदेड,दि. २३ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

जिल्ह्यातील कोविडची स्थिती, त्यादृष्टीने शाळा सुरु करताना करावयाचे नियोजन, शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या आणि त्याचे अहवाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबींवर आम्ही प्राधान्याने लक्ष केंद्रित केंद्रीत केले. सर्व परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या 23 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या शाळा आता स्थगित करण्यात आल्या असून त्या 2 डिसेंबरपासून सुरु करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी संयुक्त दिलेल्या प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या 858 शाळा असून त्यात जिल्हा परिषदेच्या 70 शाळा आहेत. इयत्ता नववी ते बारावीला शिकवणारे जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे असे एकूण 8 हजार 115 शिक्षक आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले. शिक्षकांचे नाव, त्यांची तपासणी तारीख व ठिकाण निश्चित करुन अशा याद्या महानगरपालिका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शाळारंभाची पूर्वतयारी यासंदर्भाने डायटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर आणि डायटचे प्राचार्य रवींद्र अंबेकर यांनी शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. शिक्षण समितीच्या सभेतही शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीबाबत सूचना केल्या होत्या.

जिल्ह्यातील 2 हजार 282 शिक्षकांची अँटीजन टेस्ट करण्यात आल्या असून 4 हजार 982 शिक्षकांची तपासणी करणे सुरु आहे. यापैकी 927 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. तर 2 हजार 702 जणांची चाचणी सुरु आहे. आतापर्यंत 40 टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तपासणी करुन घेण्यात येत आहे.

येत्या 1 डिसेंबरपर्यंत सर्व स्थिती सुरळीत करून 2 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले आहे.

Previous articleपुन्हा लॉक डाऊनकरण्याची वेळ येऊ नये यासाठी काळजी घ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन..
Next articleतळेगांव येथे भाजप कार्यकर्त्यांनी केली विजबिलाची होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here