राजेंद्र पाटील राऊत
शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिक विमा मिळविणारच. पीक विमा संदर्भात जागर अभियानात शेतकरी पुत्रांचा निर्धार…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पिक विमा पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पिक विमा मिळवण्यासाठी संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार आज रावनकोळा ता. मुखेड येथील शेतकरी सभेमध्ये करण्यात आला यावेळी शेतकऱ्यात प्रचंड संताप दिसून आला. यावेळी रावणकोळा गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. व शेतकरी पुत्र बालाजी पाटील सांगलीकर बालाजी पाटील ढोसणे रमाकांत पाटील जाहूर कर माधव पाटील खतगावे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी पुढील लढ्याबाबत संवाद साधला. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन संघटन करून पीक विमा कंपनीच्या विरोधातआवाज उठवण्यासाठी शेतकरी पुत्रांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी गावातील असंख्य नागरिकही उपस्थित होते.